दिघी : –मैत्रिणीच्या बहिणीला एका तरुणाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या म्हणून अज्ञात सहा इसमांनी रस्त्यावरील येणार्या जाणार्या नागरिकांना त्रास देत वाहनांची तोडफोड केली. तसेच एकाला मारून जखमी केल्याचा प्रकार मंगळवारी भारतमाता नगर दिघी येथे घडला. याबाबत सुरज जयस्वाल (वय 24, रा. वडमुखवाडी, चर्होली, पुणे) या तरुणाने दिघी पोलिस ठाण्यात सहा इसमांविरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सुरज जयस्वाल या तरुणाने त्याच्या मैत्रिणीच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याचा राग मनात धरून अज्ञात सहा तरुणांनी भारतमाता नगर येथे येणार्या जाणार्या लोकांना अपशब्द वापरून त्रास दिला. रस्त्याच्या बाजूला उभा करण्यात आलेल्या वाहनांची तोडफोड केली. रस्त्यावरील वाटसरू सोमेश्वर सोळंके या इसमाच्या डोक्याला व पोटात मारून जखमी केले. या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. याबाबत अज्ञान सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोलापूरे करीत आहेत.