नारायणगाव :- शिवजन्मभुमी युवा फाउंडेशनच्या संकल्पनेतुन प्रेरणा घेऊन नारायणगाव शेटे मळा येथील प्रसिध्द उद्योजक अमित शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाचा अनर्थ खर्च टाळुन घोडेगाव येथील सह्याद्री अदिवासी ग्रामीण प्रतिष्ठाण संचालित अनाथ मुलांच्या बालकाश्रमात खाऊ व मिटाई वाटुन व आर्थीक मदत करून वाढदिवस साजरा केला. आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांना पैकी हा एक दिवस कधीही विसरू शकणार नाही अशा भावना अमित शिंदे यांनी व्यक्त केल्या.आणि हरीओम ब्रम्हे, निलेश ताजणे, रंगनाथ गोल्हार, विनोद शेटे, शिवजन्मभुमीचे संस्थापक धंजजय माताडे, मयुर शेटे, अभिजित शेटे मित्रांचे मार्गदर्शन मिळाले असे सांगीतले.
मुलांवर देखील चांगले संस्कार होतील
फाईव्ह स्टार मध्ये केलेल्या पार्टी पेक्षा अनाथ आश्रमात केलेल्या कार्यक्रमाचा आनंद कित्येक पटीने जास्त आहे व प्रत्येकाने याच पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे अवाहन मुक्ताई देवस्थानचे विकास तोडकरी व आजित वाजगे यांनी केले.या वेळी माताडे यांनी सर्वांना विनंती केली, आपल्या मुलांच्या वाढदिवसाला त्यांना आसपासच्या अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात घेऊन जावे व तेथे खाऊ, वस्तू वाटप करावे. म्हणजे मुलांवरही चांगले संस्कार होतील. रंजल्या-गांजल्याना मदत करावी हे कळेल. या कार्यक्रमाचे आयोजन श्री गणेश मंडळ, काळे, ॠषी वाबळे, चंदु शेटे, मुन्ना आठवले, राजु भोरे, धिरज शेटे यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जितेंद्र भोर यांनी केले तर अध्यक्ष अभिजीत शेटे यांनी आभार मानले.