वाढदिवसानिमित्त जपली जुनी-नवी पिढी!

0

नगरसेवक प्रविण भालेकर राबविले विविध उपक्रम

पिंपरी-चिंचवड : शहरातील अनेक नेतेमंडळी, राजकीय कार्यकर्ते यांचे वाढदिवस म्हणजे श्रीमंतीचे ओंगळवाणे दर्शन असते. त्यांचा वाढदिवस मध्यरात्री तासभर मोठ्या आवाजाचे फटाका बॉम्ब फोडूनच सुरू होतो. मग दिवसभर कार्यक्रमस्थळी भव्य मंडपात कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी, शुभेच्छांचा वर्षाव, पुष्पहार आणि फुलांच्या गुच्छाचे ढीग, भोजनावळी सुरू राहतात…असे चित्र एका बाजुला दिसत असताना तळवडे येथील प्रभाग क्रमांक 12 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रविण भालेकर यांनी मात्र आपल्या वाढदिवसानिमित्त जुनी व पिढी जपण्याचे उपक्रम राबविले.

वृद्धाश्रमाला औषध वाटप, रुपीनगरात वृक्ष लागवड
भालेकर यांनी रुपीनगरमधील किनारा वृद्धाश्रमात जावून सर्व वृद्धांचे आशिर्वाद घेतले. त्यांच्याशी गप्पागोष्टी केल्या. अनेक बाबतीत त्यांचे सल्ले घेतले. सर्वांना फळवाटप केले. तसेच प्रकृतीची चौकशी करत संचालिकांकडून प्रत्येकाला कोणकोणती आणि किती औषधे लागतात याची माहिती घेतली. त्याची यादी करून सर्व औषधांचा पुरवठा होईल, असे सांगितले. त्यानुसार दोन दिवसांत औषधे पुरवण्यात येणार आहेत. भालेकर दरवर्षी या वृद्धाश्रमाला रोख रक्कम व शिधा पुरवठा स्वरुपात मदत करतच असतात. या दृष्टीने ते जुनी पिढी जपण्याचे काम करत आहेत. याशिवाय ‘ग्लोबल वॉर्मिंग’ हा जगापुढचा चिंतेचा विषय असल्याने नव्या पिढीसाठी पर्यावरण रक्षणाचे कामही हाती घेतले आहे. यातूनच ते रिकाम्या व योग्य ठिकाणी वृक्ष लागवड आणि नंतरही त्यांच्या रक्षणाचे काम करतात. बुधवारी त्यांनी तळवडे-रुपीनगर परिसरामध्ये पन्नास झाडे लावली. तसेच आजवर लावलेल्या झाडांच्या वाढीची पाहणीही केली.

यांची होती उपस्थिती
यावेळी नवी मुंबई महानगर पालिकेचे माजी उपमहापौर भरतभाई नखाते, नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेविका संगीता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे, गोपाळ तात्या भालेकर, ह.भ.प. रंगनाथ भालेकर, विशाल वाकडकर विरोधी पक्षनेता दत्ताकाका साने, उद्योजक सागर शेठ भालेर, गणेश भालेकर, सुनिलजी बनसोडे, पाटोदा तालुक्याचे माजी सभापती खंडूशेठ सगळे, उमाकांत सोनटक्के, विकी भालेकर, सुनिल भालेकर, संदीप चव्हाण व परिसरातील नागरिक उपस्थित होते.