अमळनेर । भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचा जन्मदिनानिमित्त कृषिउत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उदय वाघ यांचा वही तुला कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विधान परिषद सदस्या आमदार स्मिता वाघ, जिल्हा सरचिटणीस महेश पाटील, बाजार समिती संचालक प्रफुल्ल पवार, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी पंचायत समिती सभापती श्याम अहिरे, माजी जि.प. सदस्य संदीप पाटील, हिरालाल पाटील, शत्रूग्न पाटील, जिजाबराव पाटील, राकेश पाटील, श्रीनिवास मोरे, सुरेश पाटील, राजेश वाघ, शितल देशमुख, दिनेश साळुंखे, उमेश वाल्हे, कामराज पाटील, भगवान कोळी, दीपक पाटील, नाटेश्वर पाटील यांच्यासह तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांकडून 15 जूनपर्यंत वह्या स्वीकारल्या जातील असे आवाहन करण्यात आले.