वाढदिवसानिमित्त शरद पाटील यांचा अवयदानाचा संकल्प

0

चाळीसगाव । येथील जयहिंद कॉलनीतील रहिवाशी सह्याद्री प्रतिष्ठानचे चाळीसगाव तालुका सरचिटणीस शरद पाटील यांनी आपल्या 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनी वाढदिवस असल्याने कुठलाही गाजावाजा न करता घरगुती वातावरणात साजरा करून अवयव दानाचा संकल्प केला. शरद पाटील यांनी 15 ऑगस्ट या त्यांच्या वाढदिवसादिनी अवयव दानाचा संकल्प करून तशी घोषणा त्यांनी केली असून शरीरातील डोळे व हृदय हे त्यांनी मृत्यू पश्चात दान करणार असून तसा फॉर्म त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी चाळीसगावचे जीसीआय अध्यक्ष बालाप्रसाद राणा यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून त्याना अनेकांनी अवयवदान व वाढ दिवसानिमित्त कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

अवयव दान हे अनमोल दान असून आपल्या दान केलेल्या अवयवांमुळे गरजू अंध व्यक्ती दुनिया बघू शकते व एखाद व्यक्ती दुनिया बघू शकतो व त्याचा फायदा समाजाला हि होऊ शकतो याचा विचार करून माझ्या वाढदिवसाचा कुठलाही गाजावाजा न करता 15 ऑगस्ट या शुभदिनी माझा वाढदिवस असल्याने याच दिवशी अवयवदान करण्याचा संकल्प केला यासाठी पत्नी व मुलगा यांनी देखील प्रोत्सहन दिले.
शरद पाटील

यांनी केले अभिनंदन
शरद पाटील यांच्या निर्णयाचे आमदार उन्मेश पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, कृऊबाचे रमेश आबा चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष प्रदीप निकम, पं.स. सभापती दिनेश बोरसे, सपोनि राजेंद्र रसेडे, पोउनि संजय पंजे, नगरसेवक अलका सदाशिव गवळी, बबन पवार, चिराग शेख, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे, प्रवीण शिर्के, गौरव शेवाळे, दिलीप घोरपडे, रवींद्र सूर्यवंशी, पपु राजपूत, गजानन मोरे, बालाप्रसाद राणा, मुराद पटेल, विजय गायकवाड, सूर्यकांत कदम, गणेश पवार, आरिफ खाटीक, शुभम चव्हाण, संग्राम शिंदे यांनी अभिनंदन केले.