निजामपुर । साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात निजामपुर जैताणे येथील प्रा.भगवान जगदाळे यांचा लहान मुलगा अनुरागचा 5 जुलै रोजी 14 वा वाढदिवस होता त्यानिमित्त गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेत लहान मुलांना बिस्किटे व वही पेन आदी शैक्षणिक साहीत्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यानंतर वुक्षारोपण करण्यात आले. 5 जुलै तारीख असल्याने शेतात जाऊन 5 रोपे लावण्यात आली. यात 3 नारळाचे व 2 करंजीचे लावण्यात आली. यावेळी जेष्ठ सामाजिक नेते अॅड़ शरद शाह,जैताणे गावाचे सरपंच संजय खैरनार,बापुजी जगदाळे,राजनारायण जगदाळे,आशुतोष जगदाळे,विशाल जगदाळे,विवेक जगदाळे, शिक्षक मोहन वेड़ाईत , सोनवणे व एकनाथ भील आदी उपस्थितीत होते.