वाढीव कर आकारणीचा संभ्रम दूर करण्याची जनाधारची मागणी

0

भुसावळ । शहरातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक करदात्यांना 10 टक्के आकारणीच्या नावाखाली दुप्पट कर लावण्यात आला आहे. या करदात्यांनी करवसुली कारकून व मुख्याधिकार्‍यांची भेट घेतली असता दोघांकडून याप्रकरणी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे शहरातील करदात्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून यासंदर्भात जनाधार विकास पार्टीतर्फे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले.

यात नमूद करण्यात आले की, मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांना दोन हजार लोकांच्या मालमत्तेचे लिलाव करण्याचे जाहिर केले. त्यामुळे या दोन हजार नागरिकांवर बेेघर होण्याची वेळ येवून ठेपली आहे. अस्वच्छतेत दुसरा क्रमांक आला असता त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यापेक्षा करदात्यांना भयभीत करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप गटनेता उल्हास पगारे यांनी केला आहे. त्यामुळे स्वतः जिल्हाधिकार्‍यांनी मार्ग काढून मुख्याधिकार्‍यांच्या भुमिकेबाबत तपास करावा व करदात्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.