अंतुर्लीचे शेतकरी संतप्त ; रीडींग न घेताच वाढीव बिले
मुक्ताईनगर : तालुक्यातील अंतुर्ली येथील शेतकर्यांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात दंड थोपटत कृषी पंपाचे वीज बिल एचपीनुसार आकारून मागील वाढीव अंदाजीत वीज बिलांची थकबाकी रद्द करावी व वीज वितरण कंपनीने मनमानी कारभार थांबवावा आदी मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे दाद मागितली आहे.
अंदाजे बिलांमुळे शेतकरी संतप्त
अस्मानी-सुलतानी संकटांची मालिका सुरू असताना बोंडअळीने हाता-तोंडाचा घास हिरावला गेला आहे. असे असताना वीज कंपनीने अंदाजे बिले पाठवून संतापात भर घातली आहे. 2.5 एचपीची वीज बिले शेतकरी भरत असताना काही वर्षांपासून कंत्राटी कर्मचार्यांनी मनमानी पद्धत्तीने वाढीव बिले देण्याचा प्रघात सुरू केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनावर श्रीराम महाजन, त्र्यंबक पाटील, शरद महाजन, दिनेश पाटील, रमेश बारी, भाऊराव महाजन, रमेश पाटील, शिवाजी पाटील, संतोष बावस्कर, काशीनाथ महाजन, तुकाराम महाजन, वामन महाजन, गुलाबराव देशमुख, विमलाबाई महाजन आदींच्या स्वाक्षर्या आहेत.