भुसावळ। येथील प.क. कोटेचा महिला महाविद्यालयात वाणिज्य विभागातील सर्व विद्यार्थीनींसाठी वाणिज्य मंडळातर्फे ‘खेळातून व्यवस्थापन’ च्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सर्व विद्यार्थीनींनी या खेळाचा मनमुराद आनंद लुटला.
या खेळातून मानवी संसाधन व्यवस्थापनाने कशाप्रकारे व्यवस्थापन करावे म्हणजेच आपल्या कर्मचार्यांना उत्पादनवाढीसाठी व व्यवसाय वाढीसाठी कसे प्रोत्साहित करावे याचे शिक्षण देण्यात आले. सदरहू खेळाचे संचलन प्रा. डी.एम. ललवाणी यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. व्ही.एस. पाटील हे होते. त्यांनी सदरहू कार्यक्रमात आनंद लुटून व्यवस्थापनाच्या भावना विषद केल्या. प्रमुख पाहुणे म्हणून वाणिज्य मंडळ चेअरमन प्रा. एस.आय. महाजन होते. वाणिज्य मंडळाच्या प्राध्यापिका आर.एस. गजरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. सीमा पाटील, प्रा. अंजली कुळकर्णी, प्रा. शरयू कानडे, प्रा. निता चोरडिया यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थीनी उपस्थित होत्या. आभार वाणिज्य मंडळ सदस्या डॉ. एस.व्ही. पवार यांनी मानले.