वादग्रस्त अधिकार्‍यावर गुन्हा नोंदवण्यासाठी आंदोलन

0

उल्हासनगर । उल्हासनगर महापालिकेचे वादग्रस्त जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कार्यालयात मिळालेल्या फाइल्स, कोरे धनादेश आणि इतर कागदपत्रे सापडूनही महापालिका आयुक्त गणेश पाटील भदाणे यांच्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही. आयुक्तांच्या या भूमिकेविरोधात शहरातील जागरुक नागरिक, व्यावसायिक व काही समाजसेवी संस्थांनी महापालिकेच्या मुख्यालयासमोर मूक निर्देशने करून भदाणे यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी केली आहे. उल्हासनगर महापालिकेतील वादग्रस्त जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कार्यालयात विविध विभागांतून गायब झालेल्या एकूण 387 फाइल्स, सह बोगस ओळखपत्र, कोरे धनादेश सापडले होते.

या सर्व फाइल्सचा पंचनामा करण्यात आला असून त्याचा अहवाल आयुक्त गणेश पाटील याना देण्यात आला आह. मात्र, हा अहवाल आयुक्तानी तो अद्याप खुला केला नसल्याने नागरिकांचा संशय बळावला आहे. युवराज भदाणे यांना वाचवण्यासाठी काही राजकिय नेते पुढाकार घेत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही. दरम्यान, भदाणे यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शहरातील जागृत व्यावसायिक आणि काही संस्था व जनतेने उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर मूक निदर्शने करून पालिकेच्या सत्ताधारी व राजकीय नेत्यांचा निषेध केला. यावेळी त्यांनी तोंडावर काळा रुमाल बांधून हातात निषेधार्थ फलक घेतले होते.