वादग्रस्त कारखाना धारकांच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम

0

नवी मुंबई :- एम.आय.डी.सी.मधील काही कारखाने चालक नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत कारखान्यामधील रासायनिक द्रव्य नाल्याद्वारे सोडत असल्याने घणसोली परिसरात आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणाचा विरोध करत भाजपने स्वाक्षरी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.या मोहिमेअंतर्गत प्राप्त होणारी माहिती मुख्यमंत्र्यांना सादर केली जाईल असे यावेळी भाजप नवी मुंबई सरचिटणीस कृष्णा पाटील यांनी सांगितले.

दिवसेदिवस रबाले,महापे,पावणे एम.आय.डी.सी.मधून रासायानीक द्रव्ये मोठ्या प्रमाणात सोडले जात आहे.यामुळे नाकाला झिणझिण्या येणे,श्वाचोश्वास घेणे जमत नाही.त्यामुळे नवी मुंबई परिसरातील गरोदर महिला,वृद्ध नागरिक तसेच नवजात बालकांना याचा फार मोठा त्रास होत असल्याचेही त्यांनी सांगितले.त्यामुळे अश्या प्रकारचे रासायनिक द्राव्य सोडणे हे कायद्याने अयोग्य असल्याचेही सांगत अश्या कारखान्यावर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. घणसोली,पावणे व महापे आदी परिसरातील कारखाने बिनबोभाटपणे रासायनिक द्रव्ये सोडत आहेत.त्यामुळे या परिसरातील हजारो नागरिक बाधित झाले आहेत.विशेष म्हणजे पाणी तज्ञांच्या मतानुसार आश्या रासायनिक द्रव्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोच.परंतु नागरिकाना कर्क रोगासारखा दुर्धर आजार सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

या रासायनिक द्रव्याचा तोटा नागरीका बरोबरच पर्यावरणाला सुद्धा होत आहे.त्याच बरोबर रासायनिक द्रव्य नाल्याद्वारे खाडीत जात असल्यामुळे मासे सुद्धा मृत पावले आहेत.त्यामुळे मासेमारी करणाऱ्या नागरिकावर उपासमारीची परिस्थिती आल्याचे त्यांनी सांगितले. रासायनिक द्रव्ये सोडणे बंदच झाले पाहिजे असे भाजपचे मत असल्याचे पाटील यांनी निक्षून सांगितले. स्वाक्षरी मोहीम पूर्ण झाल्या नंतर आम्ही सदर निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार असून वातावरण बिघडविण्यास कारणीभूत असणाऱ्या अधिकारी,कारखाने मालक यांच्यावर कारवाई करण्यास सांगणार आहोत.