वादग्रस्त पुस्तकावर बंदी घाला

0

छत्रपती शिवाजी महाराजांशी मोदींची तुलना अयोग्यच : भुसावळात मराठा समाज संतप्त

भुसावळ : ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या जय भगवान गोयल लिखीत पुस्तकावर बंदी आणावी तसेच प्रकाशकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भुसावळ शहरासह मुक्ताईनगरात सोमवारी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करण्यात आल्याने भुसावळातील मराठा समाजबांधवांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी निषेध करीत प्रशासनाला निवेदन दिले. या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी प्रसंगी करण्यात आली.

भुसावळात मराठा समाजबांधव संतप्त
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले आणि हिमालयाच्या उंची एवढे कर्तृत्व असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी मोदींची तुलना केल्यामुळे संबंध मराठा समाजात नाराजीचे आणि संतापाचे वातावरण तयार झाले असून छत्रपती शिवाजी महाराजांची कुणाशीही तुलना होवू शकत नाही. या पुस्तकाच्या लेखकावर आणि पुस्तकाच्या प्रकाशनावर बंदी घालून पुस्तकाच्या विक्रीला बंदी घालावी व महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी लेखकाने मागावी अन्यथा महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या रोषास सामोरे जावे लागे, अशी मागणी भुसावळ तालुका सकल मराठा समाजातर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन देउन करण्यात आली. निवेदन देतांना मराठा समाज तालुकाध्यक्ष किरण पाटील, नगरसेवक मुकेश गुंजाळ, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, राहुल बोरसे, ललित मराठे, सुशील बर्गे, प्रमोद पाटील, छावा तालुकाध्यक्ष ईश्वर पवार, वकिल संघ अध्यक्ष तुषार पाटील, संजय कदम, राजेंद्र चौधरी, विजय कलापुरे, वैभव गुंजाळ, राहुल पाटील, सचिन पाटील, योगेश जाधव, गणेश बावडेकर, रजत शिंदे, प्रमोद पाटील, शुभम पाटील, रुपेश पाटील, ज्ञानेश्वर जगदाळे, मुकेश सोनवणे, सागर लापुळकर, अ‍ॅड.मोझे, संजय शिंदे, दीपक जुंबळे, धीरज मराठे, नरेश पाटील आदीची उपस्थिती होती.

पुस्तकावर बंदी आणा ः राष्ट्रवादीची मागणी
भुसावळ- ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या जय भगवान गोयल लिखीत पुस्तकावर बंदी आणावी तसेच प्रकाशकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान मोदी यांची तुलना करणे योग्य नाही. निवेदनावर युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, नगरसेवक उल्हास पगारे, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष नितीन धांडे, राजेंद्र चौधरी, राहुल, बोरसे, गणेश कोळी, रवींद्र सोनवणे, योगेश पाटील, जयंत शूरपाटणे, दीपक दीपके, योगेश नरोटे, ज्ञानेश्‍वर पाटील, रंजीत चावरीया, विशाल भंगाळे, अनुप नागपूरे, प्रदीप कोळी, संतोष माळी, समाधान चौधरी, प्रवीण आखाडे, जितेंद्र आव्हाड आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

मुक्ताईनगरात मुस्लीम समाजातर्फे निषेध
मुक्ताईनगर येथेही या पुस्तकाच्या निषेधार्थ मुस्लीम समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी मणियार बिरादरीचे हकीम चौधरी, काँग्रेसचे जिल्हा सचिव आसीफखान इस्माईलखान, मराठा समाज सेवा संघाचे दिनेश कदम, शिवसेना जिल्हा संघटक अफसरखान, गंगाधर बोदडे, आतीकखान, आसीफ शेख उस्मान, रीजवान चौधरी, शेख असगर शेख, सादीक खाटीक, अहेमद ठेकेदार, वसीम कुरेशी, मुख्तार रबाणी आदी उपस्थित होते.