जळगाव ः दरोड्याच्या गुन्ह्यात सहभाग तसेच गावठी कट्टा आणण्यासह आरोपीला सहकार्य केल्याने जळगाव जिल्हा पोलीस दलातील म्हसावद कार्यक्षेत्रातील वादग्रस्त पोलीस कर्मचारी सुशील मगरे यास पोलीस सेवेतून जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी बुधवारी बडतर्फ केले असून कर्तव्यावर दांडी मारणार्या दोन कर्मचार्यांना निलंबित करण्यात जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र सुशील मगरेप्रमाणेच कार्य करणार्या इतर मगरेंचे काय? अशा मगरेंना खात्यातून जिल्हा पोलीस अधीक्षक काय पाऊले उचलतील ? असा प्रश्न जिल्ह्यातील सुज्ञ जनता उपस्थित करीत आहेत.
दरोड्यात पोलिसानेच दिली साथ
जामनेर पोलीस ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्यात संशयीत आरोपी तथा म्हसावद कार्यक्षेत्रातील पोलीस कर्मचारी सुशील मगरे याचा सहभाग आढळल्याने जिल्ह्यात पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेला होता तसेच पहूर पोलीस ठाण्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यांतर्गत ट्रान्सपर गुन्ह्यातील संशयीत तसेच पोलीस दप्तरी कुविख्यात असलेल्या व तब्बल 23 गुन्हे दाखल असलेल्या आरोपी जिगर बोंडारे याच्या जामिनासाठी वकीलांकडे केलेले प्रयत्न तसेच जेलमध्ये जावून भेटल्याने तसेच गुन्हेगारांना कार्यक्षेत्रात आश्रय दिल्याचा आरोप सिद्ध झाल्याने तसेच गुन्हेगारासोबत कट्टा आणण्यात सहकार्य केल्याने तसेच अन्य गुन्ह्यातील सहभाग पाहता मगरे यास पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केल्याने खात्यात मोठी खळबळ उडाली.
दांडी बहाद्दर कर्मचार्यांवर निलंबनाची कुर्हाड
पोलीस सेवेत असतानाही सतत दांडी मारत असलेल्या नवप्रविष्ठ मुख्यालयातील पोलीस शिपाई योगेश प्रकाश गिरी व शेख रऊफ शेख चांद यांना विभागीय चौकशीअंती पोलीस सेवेतून कमी करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील इतर सुशील मगरेंचे काय?
अवैध धंदे चालकांसह गुन्हेगारांना सहकार्य करणार्या जिल्हा पोलीस दलातील सुशील मगरेंचे काय? असा प्रश्न या निमित्त उपस्थित होत आहे. एका मगरेचा सहभाग उघड झाल्याने त्यास सेवेतून बडतर्फ करण्यात आले मात्र गुन्हेगारांना सहकार्य करणार्या अन्य मगरेंचे (अर्थात त्या पोलिसांचे) काय ? असा प्रश्न सुज्ञ जिल्हावासीय उपस्थित होत आहे. कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अशा मगरेंचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करतील काय ? असा प्रश्न जिल्ह्यातून सुज्ञ जनतेतून उपस्थित होत आहे.