जळगाव। राष्ट्रवादीचे नेते पवार साहेबांसोबत झालेल्या बैठकीत जिल्ह्याचे सर्वच मान्यवर नेते उपस्थितीत बैठक झाली. त्या बैठकीला उपस्थित असलेल्या जिल्हाध्यक्षासह सर्वच नेत्यांना कात्री लावा अशा आशयाचे फलक विनापरवानगी शासकीय अजिंठा विश्रामगृहात लावणार्यांच्या चौकशीसाठी पक्षाच्या सामाजिक न्यायविभागातर्फे उपोषण करण्यात आले. फलक लावणारे 2 मुले सुध्दा पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजद्वारे ताब्यात घेतले. फलक तयार करणार्यांची नावे पोलीस अधिक्षकांना विनंती करुन ही कार्यवाही केल्याचे दिसून आले नाही उपअधिक्षक सांगळे यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले.
यांची होती उपस्थिती
जिल्ह्यातील वरीष्ठ नेते गुलाबराव देवकर, रविंद्रभैय्या पाटील, राजेश पाटील, मंगलाताई पाटील, कांचन सनकत, मिनल पाटील, नामदेव चौधरी, अजय जाधव, योगेश देसले, निलेश पाटील, निवोद निकम भुसावळ, कल्पना अहिरे, रोहन सोनवणे, अजय बढे यांनी मध्यस्थी करुन पोलिस उपअधिक्षक श्री. सांगोळे यांच्याशी प्रत्यक्ष जागेवर चर्चा करुन कार्यवाहीचे आश्वासन घेऊन उपोषणाची सांगता केली. या उपोषणास सनकतसह नगरसेवक उपस्थित होते. त्यासोबत जळगाव शहर सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष गणेश नन्नवरे सह. जितेंद्र शुक्ला, राजेश साळुंखे, संजय मराठे, पप्पु मराठे, संजय राणा, बापु सपकाळे, शंभु रोकडे, नईक खाटीक, अशपाक शेख आदी उपस्थित होते.