वादग्रस्त वक्तव्यामुळे शशी थरूर अडचणीत; कोर्टात गुन्हा दाखल

0

नवी दिल्ली-कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शशी थरूर आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान त्यांनी काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कुंभमेळ्यात स्नानावरून टिप्पणी केली आहे. त्यांच्या या विधानामुळे हिंदूंच्या भावनेचा अनादर झाल्याचे सांगत राजीव सिन्हा यांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पटनाच्या सीजेएम कोर्टात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत उद्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

काल शशी थरूर यांनी गंगा स्वच्छ ठेवायची आहे आणि त्यात पाप पण धुवायचे आहे असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.