वादग्रस्त वक्तव्य भोवले : जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बकालेंविरोधात गुन्हा

जळगाव गुन्हे शाखेचे कर्मचारी अशोक महाजन निलंबित

जळगाव : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी बुधवारी रात्री 10 वाजता निलंबन केल्यानंतर गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हापेठ पोलिसात बकाले यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

त्या पोलिस कर्मचार्‍याचेही निलंबन
दरम्यान, बकाले यांचे ज्या पोलिस कर्मचार्‍याशी हा संवाद घडला त्या कर्मचार्‍यासही जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी निलंबित केल्याने पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. एएसआय अशोक महाजन असे निलंबित झालेल्या पोलिस कर्मचार्‍याचे नाव असून ते गुन्हे शाखेत हजेरी मास्तर म्हणून कर्तव्यास असल्याची माहिती सूत्रांनी दिली.