वादळी पावसात केळी पिकाचे 10 कोटींचे नुकसान

0

रावेर। तालुक्यात 12 जुनच्या रात्री 9.30 वाजेनंतर झालेल्या चक्रीवादळात 23 गावतील शेती शिवारातील केळी भुईसपाट झाल्याने सुमारे 10 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असुन महसुल व कृषी विभागाने पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. तहसिलदार विजय ढगे, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी वादळाग्रस्त भागाची पाहणी केली.

पंचनामे करण्याच्या आमदारांच्या सुचना
वादळाने नुकसान झालेल्या केळी व इतर पिकांचे नुकसानी पंचनामे त्वरीत करण्याच्या सुचना आमदार हरिभाऊ जावळे यांनी केल्या आहे. रावेर तालुक्यात वादळाचा हा दुसरा तडाखा आहे. यामध्ये 8 व 9 जुनच्या पहिल्या वादळी तडाख्यात तीन गावातील शेती शिवारात सुमारे 1 कोटीचे केळीचे नुकसान झाले होते. तसेच दुसरे वादळ काल म्हणजे 12 जुन रोजी रात्री झाले.

22 हेक्टरवरिल केळीचे नुकसान
या वादळी पावसाने तालुक्यातील 23 गावातील 247 शेतकर्‍यांचे 22 हेक्टरवरिल केळीचे 10 कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज तालुका कृषी अधिकारी यांनी वर्तविला असुन युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. या नुकसानामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. तोंडी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून घेतला गेला. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी ति मागणी होत आहे. या वादळात तालुक्यातील केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.