वादळी पावसाने मका भुईसपाट : शेतकर्‍यांवर पुन्हा आर्थिक संकट

रावेर : रावेर तालुक्यात वादळी पावसाने मका भुईसपाट झाल्याने शेतकर्‍यांवर पुन्हा आर्थिक संकट कोसळले आहे. अचानक आलेल्या पावसाने दाणादाण उडाली.

शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान
रावेर परीसरासह खानापूर, अजनाड, पाडळा पट्यात शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक विजांच्या गडगडाटात वादळी पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे खानापुर येथील विकास महाजन यांचा संपूर्ण मका भुईसपाट झाला. इतरही ठिकाणी नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.