वादळी वार्‍यासह गारपीटचा फटका : शेकडो पक्षांचा वरणगाव परीसरात मृत्यू

वरणगाव : वरणगावसह परीसरात शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार वादळी वार्‍यासह गारपीटसह पावसामुळे वरणगाव आयुध निर्माणी वसाहतीमधील शेकडो पक्षांचा मृत्यू झाला. काही पक्षांना वाचविण्यात पक्षी मित्रांना यश आले असून वादळामुळे काही वृक्ष उन्मळून पडल्याने मात्र सुदैवाने जीवीतहानी टळली.

वेळीच उपचारामुळे पक्षांना जीवदान
शुक्रवारी रात्री वादळी वार्‍यासह झालेल्या गारपीटीमुळे वरणगाव आयुध निर्माणी वसाहत भागातील अनेक पक्षांचा मृत्यू झाला तर काही पक्षांना वाचवण्यात पक्षी मित्रांना यश आले. शनिवारी सकाळी रुईखेडा विभागाच्या वनपाल दीपश्री जाधव, वानखेडे , चिंचोले यांनी जिवंत पक्षांना अधिवासात सोडण्यासाठी मार्गदर्शन केले.

या पक्षीमित्रांचे घेतले परीश्रम
या स्तुत्य उपक्रमात सर्पमित्र पक्षी मित्र कैलास ठाकूर, निशांत रामटेके, स्वप्नील सुरवाडे, अक्षय तेली, लखन लोहारे, भूषण कोळी, मनीष कोळी, सागर कोळी, राहुल कोळी, प्रतीक मेढे, हर्षल कोळी, धीरज सुरवाडे, आकाश सोनार, अनिकेत वानखेडे, कुणाल गुरचळ, लखन रणशिंगे, राहुल खरात, मनोज अंबोडे व ग्रामपंचायत सदस्य बोधीसत्व अहिरे, योगेश बोरोले आदींनी सहभाग घेतला.