वादविवाद स्पर्धेत शिंदे व गोसावी यांना प्रथम क्रमांक

0

चोपडा । येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचालित प्रताप विद्या मंदिराच शतक महोत्सवानिमित्त शिक्षाकांसाठी आयोजित वादविवाद स्पर्धेत पंकज प्रतापराव शिंदे व विजय आनंदगीर गोसावी यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वाना आठवीपर्यंत पास करणे योग्य की अयोग्य? या विषयवर आयोजित या तालुकास्तरीय वादविवाद स्पर्धेत अनेक शाळातील शिक्षकानी सहभाग नोंदवला. यावेळी व्यासपीठावर प्रताप विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका अरुणा पाटील, उपमुख्याध्यापक आर.बी. देशमुख, पर्यवेक्षक डी.व्ही. याज्ञीक, डी.के.महाजन, उपप्राचार्य डी.एस. पांडव, गोविंद गुजराथी, परीक्षक डी.आर. जगताप, संदीप पाटील आदी उपस्थित होते.

वादविवाद स्पर्धेत यांची झाली निवड
प्रथम- पंकज शिंदे, विजय गोसावी (प्रताप विद्यामंदिर,चोपडा), द्वितीय- पवन लाठी, राधेःश्याम पाटील (विवेकानंद विद्यालय, चोपडा), तृतीय- सुदर्शन महाजन, एस.आर.पाटील (माध्यमिक विद्यालय, नागलवाडी) तसेच जुही अग्रवाल व मनोज वाघ (एस.एन.आर.जी. इंग्लिश मीडियम स्कुल चोपडा), सूत्रसंचलन तुषार लोहार यांनी तर आभार प्रदर्शन एम.एफ.माळी यांनी केले. प्रदीप कोळी यांनी इशस्तवन यांनी सादर केले. तर ए.एन. भट यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापिका अरुणा पाटील यांनी मनोगतातून सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच परीक्षक डी.आर. जगताप, संदीप पाटील यांनी शाळेने राबवलेल्या या स्तुत्य उप्रक्रमाचे कौतुक करत शाळेने तालुक्यात उत्तम आदर्श निर्माण केल्याची भावना व्यक्त केली.