वाद मिटवण्याबाबत फडणवीसांना तसे बोललो नाही : माजी मंत्री एकनाथराव खडसे

The stories of Fadnavis being strangled are completely false : MLA Eknathrao Khadse मुक्ताईनगर : देवेंद्र फडणवीस यांच्याशी मिटवून टाकण्याबाबत कुठलीही चर्चा मी नाशिकमध्ये केली नाही केवळ त्यांची भेट घेण्याबाबत मी बोललो होतो, असे स्पष्टीकरण माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी मंत्री महाजनांच्या चाळीसगाव्यातील दाव्यानंतर सोमवारी दिले आहे. मला भेट हवी आहे, अशी चर्चा मी केवळ फडणवीस यांच्याशी केली, महाजनांशी नाही, त्यानंतर ते फॉरेनला गेले मात्र नंतर मधल्या कालखंडात भेट झाली नाही, असेही खडसे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले. नाथाभाऊ भाजपामध्ये पुन्हा जाणार या चर्चांना पूर्णविराम देताना मी खोक्यावर विकला जाणरा माणूस नक्कीच नाही, अशा शब्दात त्यांनी स्पष्टीकरण दिले.

साहेबांसोबत घेणार अमित शहांची भेट
शरद पवार साहेबांसोबत मी अमित शहांची भेट घेणार आहे त्यामुळे होणार्‍या चर्चांना काहीही अर्थ नाही. तीन तास मी भेटीसाठी थांबून होतो, असे खासदार रक्षा खडसे यांनी गिरीश महाजनांना सांगितल्याचे काल महाजन म्हणाले होते. यावर खडसे म्हणाले की, मी खासदारांशी चर्चा केल्यानंतर रक्षा खडसे यांनी असे काहीही सांगितले नाही, असे सांगितले. अमित शहांची भेट घेण्यासाठी आम्ही दिल्लीत आल्याचे व दूरध्वनीवरून संभाषण झाल्याचे रक्षा खडसे यांनी महाजनांना सांगितले असल्याचे खडसे म्हणाले. अमित शहांच्या भेटीचे कारण काय याबाबत माध्यमांना सर्वच कारणे सांगायची नसताही, असेही खडसे म्हणाले.

आता काय मिटवायचे सर्वच तर सुरूच आहे
ईडी, सीबीआय, अ‍ॅन्टी करप्शनची चौकशी सुरू असताना आता काय मिटवायचे आहे? असा प्रश्न खडसे यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

श्रद्धा सबुरीची महाजनांना गरज
आपण गिरीश महाजनांची लहान पणापासूनच काळजी घेतली असून त्यांनी आता माझी काळजी करण्याची गरज नाही. श्रध्दा आणि सबुरीची गरज मला नव्हे तर त्यांना आहे, अशा शब्दांमध्ये खडसेंनी महाजनांवर जोरदार पलटवार केला.

मी खोक्यावर विकला जाणारा माणूस नाही
नाथाभाऊ आता भाजपामध्ये जाण्याचा प्रश्नच नाही शिवाय मी खोक्यावर विकला जाणारा माणूस नाही, असेही खडसे यांनी भाजपात प्रवेश करण्याच्या प्रश्नावर बोलताना सांगितले. ते म्हणाले की, राष्ट्रवादीने मला आमदारकी दिली, प्रतिष्ठा दिली त्यामुळे आता मी पुन्हा भाजपामध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही.