वानखेड अत्याचाराच्या निषेधार्थ यावलमध्ये निषेध मोर्चा

0

बारी समाज एकवटला : दोषींवर कठोर कारवाईसाठी प्रशासनाला निवेदन

यावल- शहरातील समस्त बारी समाजाच्या वतीने वानखेड, ता. संग्रामपूर येथे एका गतिमंद मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. शहरातील बारी वाडा चौकातून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मूक मोर्चा महिला व पुरुषांचा मोठ्या संख्येत सहभाग होता. तहसील कार्यालयाच्या समोर आंदोलकांनी पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या संदर्भात माहिती देत तहसीलदार कुंदन हिरे यांना निवेदन दिले. संशयिताला तत्काळ अटक होऊन जलद न्यायालयामध्ये हा खटला चालवण्यात यावा व याकामी सरकारी वकील म्हणून अ‍ॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती शासनाने करावी, अशी मागणी करण्यात आली.