वाबळेवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

0

शिक्रापूर । शिक्रापूर येथील पूना डाळ मिल ते वाबळेवाडी रस्त्यासाठी जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांच्या जि. प. निधीतून 14 लाख 12 हजार रुपयांचा निधी देण्यात आला. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन मांढरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच आबाराजे मांढरे, पंचायत समिती सदस्या जयमाला जकाते, ग्रामपंचायत सदस्य संतोष भुजबळ, गौरव करंजे, निलेश थोरात, सुजाता खैरे, भगवान वाबळे, गीता चव्हाण, मीनाताई सोंडे, केशव वाबळे, दिलीप वाबळे, दत्ता राऊत, ग्रामविकास अधिकारी राठोड, अभियंता धोंडे उपस्थित होते.

सर्व पदाधिकार्‍यांनी देशात नावलौकिक असलेल्या वाबळेवाडी शाळेला भेट देऊन शाळेत सुरू असलेल्या विविध उपक्रमांबद्दल माहिती घेऊन राष्ट्रपती पुरस्कार विजेते मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचे कौतुक केले. शाळेच्या बाजूला ओढा असल्याने शाळेला चारही बाजूने कंपाउंड असणे गरजेचे असल्याचे शाळा प्रशासनाने मांढरे यांच्या निर्दशनास आणून दिले. शाळेची गरज ओळखून जि. प. अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांना तात्काळ पत्र लिहून शाळेच्या कंपाऊंडसाठी त्वरित 20 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मांढरे यांनी केली.