मुक्ताईनगर- तालुक्यातील वायला ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा शेतकरी पुंडलिक देवराम कोळी (44) यांचा शेतात विद्युत शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. कोळी हे गट नंबर 24 मधील शेतात विहिरीवरील मोटार बंद करण्यासाठी गेले असता शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. मुक्ताईनगर पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोळी यांच्या पश्चात मुलगी, दोन मुले, जावई असा परीवार आहे.