‘वायसीएम’साठी एक्स-रे मशिन्सची खरेदी करा

0

-राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांची मागणी

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील तीन एक्स-रे मशिन बंद आहेत. सध्या एकाच मशिनवर काम सुरू असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. केवळ एक्स-रे मशीन्सअभावी माफक दरातील या सुविधेपासून रुग्णांना वंचित रहावे लागल्याने सामान्य रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने नविन एक्स-रे मशिन्सची खरेदी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केली आहे.

दुरूस्तीवर लाखोचा खर्च
आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रुग्णालयातील एक्स-रे मशिन्स दहा वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यामुळे सातत्याने त्यामध्ये बिघाड होत आहे. त्यामुळे दुरुस्ती करण्याचे काम खासगी ठेकेदाराकडे दिले होते. संबंधित ठेकेदाराने ही मशिन दुरुस्तही करून दिली. परंतू पुन्हा त्यामध्ये बिघाड होत असेल तर त्याच जुन्या मशिन्सवर लाखो रुपयांची का करण्यात येत आहे? असा सवाल या माध्यमातून उपस्थित होत आहे. सध्या रुग्णालयात एकूण चार मशिन आहेत. या रुग्णालयात एक्स-रे विभागातील तीन मशिन्स बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे एकाच मशिनवर रुग्णांचे एक्स-रे काढले जात आहेत.

सर्वसामान्य रुग्णांचे हाल
एकाच मशिनवर कामकाज सुरू असल्याने नागरिकांना अधिक वेळ ताटकळत उभे रहावे लागत आहे. शहरातील रूग्णांना अल्प दरात हि सेवा मिळते. मात्र, ही सुविधाच बंद पडल्यामुळे आता रुग्णांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयातून एक्स- रे चाचणी करून घ्यावी लागते. पण, त्यासाठी जास्त शुल्क भरावे लागत आहे. त्यामुळे महापालिका रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना गेल्या काही दिवसांपासून एक्स-रे मशीन्सअभावी गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे एक्स रे मशिन दुरुस्तीवर लाखो रूपयांचा खर्च करण्यापेक्षा महापालिकेकडून नविन एक्स-रे मशिन्सची खरेदी करण्यात येणे गरजेचे आहे.असे बच्छाव यांनी केली आहे.