देहरादून : उत्तराखंडमधील केदारनाथजवळ वायूसेनेचे एमआय 17 हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत दोन पायलटसह चार जण जखमी झाले. हेलिकॉप्टरचा तारेला स्पर्श होऊन मंगळवारी सकाळी ही दुर्घटना घडली. हेलिकॉप्टर गुप्तकाशीवरुन साहित्य घेऊन केदारनाथकडे निघाले होते. हेलिकॉप्टरमध्ये 6 जण होते. यापैकी एका पायलटला व इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे. हेलिपॅडपासून अवघ्या 60 मीटर अंतरावर हेलिकॉप्टर कोसळले.