गांधीनगर: ‘वायू’ चक्रीवादळामुळे गुजरात राज्याला मोठा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान आता धोका काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र असे असले तरी धोका पूर्णत: संपला नाही. 150 किलोमीटर प्रति तास वेगाळे गुजरातच्या दिशेने सरकणाऱ्या चक्रीवादळाने आपली दिशा बदलली असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीनजीकच्या प्रदेशांजवळून जाणार आहे. त्यामुळे गुजरातवरील धोका काही प्रमाणात आहेच. हे चक्रीवादळ वेरावळ, पोरबंदर आणि द्वारकाजवळून जाणार असून या भागांमध्ये जोरदार पावसाची शत्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच यादरम्यान आपात्कालिन परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या 52 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच नौदल, हवाई दल आणि सैन्यदलासहित तटरक्षक दलालालही अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आहेत.
Next Post