वारकरी मेळावा

0

रांजणगाव । संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज या सारख्या संतांमुळेच आज महाराष्ट्रात अध्यात्म टिकून आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय वारकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांनी रांजणगाव महागणपती मंदिरात केले. रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरात भव्य वारकरी मेळाव्याचे आयोजन केले होते.

या मेळाव्यास मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच सुरेखा लांडे, उपसरपंच नवनाथ लांडे, ह.भ.प.देवीदास महाराज बार्णे, ह.भ.प.परमेश्वर महाराज बोधले, नंदु भसे, अशोक नहार, ह.भ.प.आसाराम महाराज बढे, ह. भ. प. नामदेव महाराज चव्हाण, ह. भ. प. चंद्रकांत भरेकर यांसह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. दिल्ली येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय महापारायण नियोजनासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजक राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले.