वाराणशी सुपरफास्टमध्ये रेल्वे प्रवाशाचा मृत्यू

0
भुसावळ- डाऊन वाराणशी सुपरफास्ट (12165) या गाडीने मुलगा व सूनेसोबत कुर्ला ते भदोई असा प्रवास करीत असलेले मोहंमद मुकीन अ. सत्तार (वय 70) यांचे कुठल्या तरी आजाराने धावत्या गाडीतच गुरूवारी दुपारी 12. 45 वाजेपूर्वी निधन झाले. त्यांचा मृतदेह येथील स्थानकावर उतरविण्यात आला. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रत्नागिरी वाराणशी सुपरफास्ट या गाडीच्या एस- 2 या डब्यातील 36 क्रमांकाच्या सीटवर बसून मोहंमद मुकीत अ. सत्तार (वय 70, रा. आझाद नगर, मालाड वेस्ट, मुंबई) हे मुलगा व सून यांच्या सोबत कुर्ला ते भदोई असा प्रवास करीत असतांना कुठल्या तरी आजाराने त्याचा गाडीतच मृत्यू झाला. हवालदार सरोदे पुढील तपास करीत आहे.