वाराणसीत रेल्वेच्या कामांमुळे सहा गाड्या रद्द

0

भुसावळ – वाराणसी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठ वर वॉशेबल अ‍ॅप्रॉनच्या कामासाठी 15 जून ते 26 जुलै दरम्यान सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. भुसावळ विभागातून या गाड्या धावत असल्याने रेल्वे प्रवाशांनी गैरसोय टाळावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

या गाड्या झाल्या रद्द
18 जून ते 27 जुलै दरम्यान अप 11072 वाराणसी-एलटीटी कामायनी एक्सप्रेस, अप 16230 वाराणसी-म्हैसूर एक्सप्रेस (16 ते 26 जुलै पर्यंत), अप 17324 वाराणसी-हुबळी एक्सप्रेस (17 व 24 जून, 1, 8, 15 व 22 जुलै रोजी) रद्द करण्यात आली आहे. डाऊन मार्गावरील 11071 एलटीटी-वाराणसी कामायनी एक्सप्रेस 16 जून ते 25 जुलै दरम्यान, 16229 म्हैसूर-वाराणसी एक्सप्रेस (14, 19, 21, 26, 28 जून तसेच 3, 5, 10, 12, 17, 19 व 24 जुलै) तसेच 17323 हुबळी-वाराणसी एक्सप्रेस (15, 22, 29 व 6, 13 व 20 जुलै) साठी रद्द करण्यात आली आहे.