वाराणसीसह गोरखपूर व काझी पेठसाठी विशेष गाड्या

0

उन्हाळ्याच्या सुटीत रेल्वे प्रवाशांची होणार सोय

भुसावळ- उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांना असलेली गर्दी पाहता मुंबई -गोरखपूर, मुंबई-वाराणसी, पुणे-काझीपेठ दरम्यान विशेष सुटीकालीन गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाड्यांमुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई-वाराणसी विशेष गाडी
गाडी क्रमांक 02055 साप्ताहिक मुंबई-वाराणसी एक्सप्रेस 14 मे तसेच 21 मे रोजी पहाटे पाच वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी 10 वाजता वाराणसी पोहोचणार आहे. गाडी क्रमांक 02056 साप्ताहिक विशेष वाराणसी-मुंबई एक्स्प्रेस 15 मे व 22 मे रोजी सकाळी 10 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी 1.20 वाजता मुंबई पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, ईगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, ईटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, अलाहाबाद, छोकी या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

मुंबई-गोरखपूर विशेष गाडी
गाडी क्रमांक 02047 साप्ताहिक विशेष गाडी मुंबईहून 13 ते 20 मे रोजी दर सोमवारी दुपारी 4.40 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी रात्री 11.45 वाजता गोरखपूर पोहोचेल तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 02048 गोरखपूर-मुंबई एक्स्प्रेस दर बुधवारी 15 व 22 मे रोजी सकाळी 8.50 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी दुपारी 2.55 वाजता मुंबई पोहोचेल. या गाडीला दादर, कल्याण, ईगतपुरी, मनमाड, भुसावळ, खंडवा, ईटारसी, भोपाल, बीना, झाँसी, कानपूर, लखनऊ, बाराबांकी, गोंडा या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

पुणे-काझीपेठ विशेष गाडी
गाडी क्रमांक 02151 साप्ताहिक पुणे-काझीपेठ एक्स्प्रेस 20, 27 मे तसेच 3, 10 व 17 जून रोजी रात्री 9.30 वाजता पुण्याहून सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी सायंकाळी 6.35 वाजता काझीपेठला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 02152 काझीपेठ-पुणे एक्स्प्रेस दर मंगळवारी 21 व 28 मे तसेच 4, 11 व 18 जून रोजी सायंकाळी सात वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सायंकाळी 5.40 वाजता पुण्याला पोहोचेल. या गाडीला पुणे, दौंड, कोपरगांव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामनगाव, पुलगाव, वर्धा, वरोरा, चंद्रपूर, बल्लारशाह, शिरपूर, काघजनगर, रामागुंदम, पेधापल्ली, काझीपेठ रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.