जळगाव। महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसर्या मजल्यावर सभापती वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी सभेचे आयोजन शुक्रवार 12 मे रोजी करण्यात आले आहे. यासभेत प्रशासनाकडून 8 विषय ठेवण्यात आलेले आहेत. या वार्ड क्र. 4 ची साफ सफाई महापालिकेच्या कर्मचार्यांडून करण्याची मागणी तेथील दोघ नगरसेकांनी प्रशासनाकडे केल्याने या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येणार आहे. शहरात 22 प्रभागांत साफ सफाईसाठी एकमुस्त पद्धतीने ठेके देण्यात आलेले आहेत. तर वार्ड क्र. 2 व 4 ची फेर ई निविदा काढण्यात आली होती. वार्ड क्र. 2 मध्ये एकही निविदा प्राप्त झालेली नाही. वार्ड क्र. 4 साठी 5 निविदा प्राप्त झाल्या आहेत. सर्वात कमी रकमेची निविदा ही सहजीवन स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित यांची 2 लाख 75 हजार रूपयांची यांची आहे. याप्रस्तावास प्रशासनाची मान्यता असून यावर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रशासनाने स्थायी समोर हा प्रस्ताव ठेवला आहे.
महापौरांनी दिले पत्र
यात वार्ड क्र. 4 मधील दोघं नगरसेवक दत्तात्रय कोळी व नगरसेविका उज्वला बाविस्कर यांनी साफ सफाई मक्ता ठेकेदाराला न देता महापालिकेच्या कर्मचार्यांकडून वार्डांतील सफाई करण्याचे पत्र प्रशासनास दिले आहे. या पत्रावर महापौर नितील लढ्ढा यांनी वार्ड क्र. 4चा सफाईमक्तेचा कार्यादेश मक्तेदारास देण्यात येऊ नये असे आदेश देऊन वार्ड क्र. 4 ची साफ सफाई महापालिकेच्या कर्मचार्यांकडून करून घेऊन महापालिकेचे आर्थिक जोपासावे असे म्हटले आहे. यासोबतच अमृत अभियांनतर्गत मेहरूण येथील खुल्या जागेवर उपवन उद्यान तयार करण्यात येणार आहे. यासाठी ई निविदा प्रक्रीया राबविण्यात आली असून सर्वात कमी दर असलेल्या श्री गजानन एन्टरप्रायझेस यांची निविदा स्वीकारण्यात यावी असा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला असून यावर स्थायीत निर्णय घेण्यात येणार आहे.