पुणे । पत्नीकडे वाईट नजरेने पाहत असल्याच्या संशयावरून तलवारीने वार करून दोघांना गंभीर जखमी करणार्याला 3 वर्षे सक्तमजुरी आणि अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त 20 दिवस कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. मणियार यांनी हा आदेश दिला आहे. प्रमोद वाल्मिकराव भगत (वय 37, रा. धानोरी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत सुभाष सखाराम परब (वय 37, रा. लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 3 जानेवारी 2015 रोजी चौधरीनगर येथे घडली होती.