धुळे : तालुक्यातील वालखेडा येथे इतर विकास ग्रामीण कार्यक्रम 2016-17 तून झालेल्या डांबरीकरणानंतर ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी लाच मागणार्या सरपंच केवळबाई ठाकरे, त्यांचा मुलगा डॉ.कैलास ठाकरे व वालखेडा ग्रामसेवक प्रवीण एम.जाधव यांच्याविरुद्ध धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता तर ग्रामसेवक जाधव यास अटक करण्यात आली होती.
मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसर्या दिवशी पथक बुधवारी वालखेडा येथे गेल्यानंतर सरपंच व पूत्र पसार झाल्याचे पथकाला आढळून आले. तपास एसीबीचे उपअधीक्षक शत्रूघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले करीत आहेत.