वालचंदनगर येथील कळंब रस्त्याची दुरुस्ती सुरू

0

वालचंदनगर । वालचंदनगर येथील भारत हौसिंग सोसायटी ते कळंब या साडेतीन किमी रस्त्याची चाळण झाल्याची बातमी दै. जनशक्तिच्या 3 डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाल्यावर चार दिवसांत रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली आहे. परंतु हा रस्ता पुर्ण डांबरीकरण करणे आवश्यक आहे.

कळंब येथील महाविद्यालय,फडतरे पालिटेक्निक व आयटीआयचे विद्यार्थी व कामगार यांना हा रस्ता वाहतुकीसाठी गरजेचा असून या रस्त्याने मंगळवेढा, पंढरपूर, अकलूज व सांगोला या एसटी बसेस या मार्गाने जात असतात. जंक्शन ते कळंब हा नऊ किमी रस्ता केंद्र सरकारच्या ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला होता पण तो फक्त जंक्शन ते भारत हौसिंग सोसायटी पर्यंतच फक्त पाच किमी पूर्ण डांबरीकरणासह केला व निधी संपला असे सांगून काम थांबवले. ह्या उर्वरित रस्त्याचे पूर्ण डांबरीकरण लवकरात लवकर करण्यात यावे ही सर्वांची मागणी आहे. परंतु तात्पुरती दुरुस्ती करून या मागणीला बगल देण्यात आली आहे.