A Youth Who Had Gone To Meet His Sister Died After Drowning In A Riverbed : An Incident In Chalisgaon Taluka पाचोरा : शहरातील रहिवासी असलेल्या तरुणाचा चाळीसगाव तालुक्यातील वालझिरी येथील नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, 27 ऑक्टोबर रोजी घडली. राहुल सुरेश चौधरी (17, श्रीराम नगर, सिंधी कॉलनी, पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. राहुल हा भाऊबीजेसाठी आपल्या बहिणीकडे गेला होता मात्र नदीपात्रात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्तर करण्यात आली.
नदीपात्रात पाय घसरून पडल्याने मृत्यू
राहुल हा भाऊबीज सणासाठी गावी आला होता मात्र गुरुवार, 27 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास वालझिरी (ता.चाळीसगाव) येथे आयोजित नवसाच्या कार्यक्रमात आल्यानंतर नदीपात्राजवळ हात पाय धुण्यासाठी गेला असता पाय घसरून नदीपात्रात पडला. सोबतच्या मुलांनी व परीवारातील सदस्यांनी तत्काळ उपस्थितांच्या मदतीने राहुल यास पाण्यातून बाहेर काढत चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित करताच कुटूंबियांनी टाहो फोडला. मयत राहुल चौधरी या तरुणाच्या पश्चात आई, बहिण, मेहुणे असा परीवार आहे.