वाल्हेकरवाडीतून दोन हजार सूचना अर्ज संकलित

0

पिंपरी-चिंचवड : राज्याच्या नगरविकास विभागाकडून अनधिकृत घरे अधिकृत करण्यासाठी 21 जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप नियमावलीनुसार, नागरिकांच्या सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यानुसार, वाल्हेकरवाडी सेक्टर 30 आणि 32 मधील रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दोन हजार सूचना अर्ज जमा केले आहेत. वाल्हेकरवाडीतील गुरुद्वारा चौक परिसर, चिंतामणी चौक, सायली कॉप्लेक्स, दत्तमंदिर परिसरातील नागरिक चिंतामणी चौकात एकत्र आले होते. नागरिकांनी सूचना अर्ज भरून दिले. अनधिकृत घरे अधिकृत करण्याबाबत तसेच शास्तीकराबाबत नागरिकांनी सूचना मांडल्या.

यांची होती उपस्थिती
यावेळी चंदा निवडुंगे, वासंती मेंगशेट्टी, संगीता कवडे, रजनी पाटील, जयश्री नारखेडे, रुपाली महाजन, दिपाली चौधरी, पल्लवी रोकडे, मनीषा बनसोडे, विद्या देवरे, अंबिका गुल्लपल्ली, शारदा पोहेकर, नेहा घारे, नेहा चिघळीकर, राणी सिंग, वैशाली भांगीरे, वैशाली कदम, मनीषा शर्मा, रोहिणी लांडगे, नरेंद्र वर्मा, नारायण चिघळीकर, अतुल वरपे, तानाजी शेळके, दत्ता गायकवाड, गणेश सरकटे, ज्ञानेश्वर महाजन, राजू पवार, तेलंगे, संदीप कांबळे, मुरलीधर राणे, अमोल पाटील आदींची उपस्थिती होती.

जाचक भर भरणार नाही
सुमारे दोन हजार सूचना अर्जांचे वाटप घर बचाव संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी केले. नागरिकांनी अनधिकृत घरांचा प्रश्न आणि शास्तीकराचा प्रश्न हे दोन्ही मुद्दे सूचना स्वरुपात मांडले. सेक्टर 30 व 32 मधील अनेक घरांवर शास्तीकराने लाखोंचा आकडा पार केला आहे. शास्तीकरामुळे परिसरातील निम्म्यापेक्षा जास्त म्हणजेच 2500 पेक्षा जास्त राहिवाशांनी अद्याप शास्तीकर आणि मूळ कर भरला नसल्याचे सांगितले. हा जाचक कर आम्ही भरणार नाही, यावर आम्ही ठाम आहोत, असेही नागरिकांनी सांगितले.

रिंगरोड बाधितांना पाठिंबा
समिती समन्वयक विजय पाटील, रेखा भोळे, शिवाजी इबितदार, राजेंद्र देवकर यांनी वाल्हेकरवाडी चौकातील सभांमध्ये मार्गदर्शन केले. रिंगरोड बाधितांसाठी आम्हीदेखील रस्त्यावर उतरणार असल्याचे वाल्हेकरवाडी सेक्टर 30 आणि 32 मधील नागरिकांनी सांगितले. राज्याच्या नगरविकास विभागाचे मुख्य प्रधान सचिव यांच्याकडे आजपर्यंत अडीच हजार सूचना जमा करण्यात आल्या असून, अजून अडीच हजार सूचना जमा करणार असल्याचे घर बचाओ संघर्ष समितीचे विजय पाटील यांनी सांगितले.