वाल्हेकरवाडीत घरातून 4 तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास

0

पिंपरी चिंचवड ः घराचा दरवाजा ओढून दळण आणण्यासाठी गेलेल्या महिलेच्या घरात घुसून चोरट्याने कपाटातील दीड लाख रूपयांचे 4 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना वाल्हेकरवाडीतील नंदनवन सोसायटीत गुरूवारी (दि.16) सायंकाळी साडेसहा वाजता घडली. सपना दिवाकर काळे (वय-24, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी या गुरूवारी सायंकाळी घराचा दरवाजा ओढून दळण आणण्यासाठी गेल्या होत्या. चोरट्याने त्यांच्या घरात घुसून कपाटातील 1 लाख 45 हजार 600 रूपयांचे 4 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.