रावेत। विविध कंपनीच्या सीएसआर निधी अंतर्गत वाल्हेकरवाडी, प्रभाग 17 मधील प्रेमलोक पार्क, एसकेएफ कॉलनी परिसरात ई-टॉयलेट उभारणीच्या कामाचे उद्घाटन नगरसेविका करुणा चिंचवडे व माधुरी कुलकर्णी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. चांगल्या स्वरुपाच्या ई-टॉयलेटस् परिसरात उभ्या राहत असल्याने महिलांची स्वच्छतागृहाअभावी होणारी कुचंबना थांबणार आहे. कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत विविध कंपन्या समाजोपयोगी कामासाठी निधी संकलित करीत असतात. या उपक्रमामध्ये दारिद्य्र निर्मूलन, आरोग्य सुविधा, पेयजल पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता आदी बाबींचा या योजनेमध्ये सहभाग असतो. विकासासाठी या निधीच्या माध्यमातून राबविली जाणारी योजना महत्त्वाकांक्षी ठरते. शहराच्या विकासात विविध कंपन्या सातत्याने हातभार लावत असतात.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमप्रसंगी नगरसेवक नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, पोलीस निरीक्षक संजीव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे, एक्साईड बॅटरीचे संचालक संजय गायकवाड, निमा गिद, शेखर चिंचवडे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता देवन्न गट्टूवार आदी उपस्थित होते.
उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांचा अभाव असल्यामुळे महिला व नागरिकांची कुचंबना होत आहे. परंतु, आता आमच्या प्रभागात सीएसआर निधी अंतर्गत ई-टॉयलेट सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रभागात जेथे वर्दळीची ठिकाणे आहेत; तेथे जागा उपलब्ध असेल तर अशा सर्व ठिकाणी लवकरच ई-टॉयलेटची उभारणी करण्यात येणार आहे.
माधुरी कुलकर्णी, नगरसेविका.