वाल्हेकरवाडीत संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा उत्साहात

0

पिंपरी-चिंचवड : संत नामदेव महाराजांच्या 667 व्या समाधी सोहळ्यानिमित्त वाल्हेकरवाडी येथे नामदेव शिंपी समाज संस्थेतर्फे संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. समाधी सोहळा कार्यक्रमाच्या सुरुवातीला विठ्ठल-रुक्मिणी व नामदेव महाराज यांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. सत्यनारायण महापूजा करून गजानन महाराजांचे भजन व हरिपाठ, तसेच समाधी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

नवी कार्यकारिणी अशी
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील नामदेव शिंपी समाज संस्थेत वार्षिक सर्वसाधारण सभा व आगामी 2017-18 या वर्षासाठी कार्यकारणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी मोहन मुळे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून एकनाथ सदावर्ते, सुरेश परदेशी, अनिल पोरे यांची निवड करण्यात आली. तसेच सचिव- प्रशांत बेंद्रे, सहसचिव- प्रसाद खोले, मनोज भूतकर, खजिनदार- औदुंबर बगाडे, प्रकाश सुपेकर, सल्लागार रामदास पिसे, पुरुषोत्तम खर्डे, अशोक बाचल, मारुती मुळे, मंदिर व्यवस्थापक- ज्ञानेश्वर तांदळे, सोमनाथ पतंगे, मोहन ढवळे आणि चंद्रशेखर क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे.