वाळुचा ट्रक तलाठ्यांनी पकडला

0

भडगाव । पंचायत समिती समोरील पेट्रोल पंपाजवळ वाळुचा क्षमतेपेक्षा जास्त भरलेला एक डंपरला तलाठींनी पकडला. पुढील कार्यवाही करण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे लावण्यात डंबर लावण्यात आला आहे. एम.एच.23 डब्लू 9924 या क्रमांकाचा वाळू डंपर चाळीसगावकडे जात असताना तलाठींनी अडवला. त्यात क्षमतेपेक्षा जास्त वाळु भरलेली आढळून आली असुन दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. ठेका बंद करण्याचा अधिकार जिल्हाधिकारींना असल्याने नायब तहसिलदार मुकेश हिवाळे यांनी सांगितले. संबंधीत डंपर राहुल पवार मांडोळे, विजय नाईक या तलाठींनी पकडले आहे. रात्री देखील डंपरने वाहतुक होते. तसेच शहरातील अवैध वाळु वाहतुक करणारे ट्रक्टर धारकावर महसुल प्रशासन कार्यवाही का करण्यात येत नाही, असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. शासकीय कामावर वाळु टाकण्याचा नावाखाली खाजगी कामावर रात्रंदिवस वाहतुक केली जात आहे.