वाळूची अवैध वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पकडले

0

जळगाव |शहरात सोमवारी तहसीलदारांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहिम राबवली. या मोहिमेमध्ये पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. हे ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालय आवारात उभे केले. तहसीलदार अमोल निकम व त्यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी शहरात ही मोहिम राबवली. यावेळी पथकाने वाळू वाहतूक करणारे अनेक डंपर व ट्रॅक्टरची तपासणी केली.तपासणीमध्ये वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे असलेला परवाना तपासला. शिवाजीनगर परिसरात तीन ट्रॅक्टर चालकांकडे वाळू वाहतुकीच्या पावत्या आढळून आल्या नाहीत. ते ट्रॅक्टर्स प्रशासनाने ताब्यात घेतले असून जिल्हाधिकारी कार्यालयात आवारात लावण्यात आले आहेत. या वाहनांवर नवीन वाळू धोरणानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार निकम यांनी सांगितले.