Stealth Transportation Of Sand : Crime Against tractor driver in Amalner अमळनेर : अमळनेर पोलिसांनी अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणार्या ट्रॅक्टरवर कारवाई करीत मंगळवारी दुपारी तीन वाजता ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.
परवाना नसल्याने चालकाविरोधात गुन्हा
अमळनेर शहरातील राजाराम नगर परीरातून विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. पोलीस पथकाने मंगळवार, 27 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता कारवाई करत वाळूचे ट्रॅक्टर पकडले. ट्रॅक्टर चालकाला वाळू वाहतुकीचा परवाना विचारला असता त्याने उडवा उडवीची उत्तर दिले. तसेच ट्रॅक्टरमधील वाळू खाली करून ट्रॅक्टर घेऊन पसार झाला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक दीपक गणेश पाटील (रा.शिरूर नाका, अमळनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार विलास पाटील करीत आहे.