वाळूच्या डंपरने चिमुकल्यास चिरडले

0

जळगाव। घराजवळच काका तसेच चुलत भावांसोबत कचरा टाकण्यासाठी गेलेल्या चिमुकल्यास घरी परतत असतांना भरधाव येणार्‍या डंपरने चिरडल्याची घटना जळगावातील निमखेडी रस्त्यावर घडली. दरम्यान, घटनेनंतर संतप्त जमावाकडून डंपर पेटवून देण्यात आले. तर डंपरचालक हा घटनास्थळावरून फरार झाला होता. देवांश उर्फ दक्ष कैलास भदाणे (वाणी) असे मयत बालकाचे नाव आहे.

निमखेडीजवळील हितवर्धनी सोसायटीत कैलास दगडू भदाणे हे आई-वडील, पत्नी तसेच तीन भावांसह एकत्र राहतात. घरापर्यंत महानगरपालिकेची घंटागाडी येते नसल्याने बुधवारी सकाळी कैलास भदाणे यांचा तीन वर्षीय मुलगा देवांश हा काका विनोद व चुलत भाऊ धिरज, यश यांच्यासोबत निमखेडी रस्त्यावर कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडला होता. 7.30 वाजेच्या सुमारास कचरा टाकल्यानंतर घराकडे परतत असतांना निमखेडी कडून भरधाव येणार्‍या एमएच.19.वाय.3757 या वाळु डंपरने दक्ष याला
चिरडले.