वाळूच्या वादातून जळगावात तरुणाचा खून

The murder of a young man in Jalgaon has an edge of animosity : A Case Of Murder Against Both जळगाव : वाळू व्यवसायाच्या वादातून जळगावातील तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब मंगळवारी रात्री घडली. निवृत्तीनगर भागातील बंधन बँकेसमोर मंगळवारी रात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास भावेश उत्तम पाटील (28) या तरुणाची चाकूचे वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरोधात जळगाव जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
मयताचा भावेश उत्तम पाटील यांचा चुलतभाऊ कैलास मंगल पाटील (आव्हाणे) यांनी जिल्हापेठ पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसारनिवृत्तीनगर भागात असणार्या बंधन बँकेच्या समोर मंगळवारी रात्री 12 वाजेनंतर भावेश उत्तम पाटील यांची हत्या करण्यात आली. संशयीत मनीष नरेंद्र पाटील (22, रा.आव्हाणे, ता.जळगाव) आणि भूषण रघुनाथ सपकाळे (32, रा.खेडी खुर्द, ता.जळगाव) या दोघांनी पूर्व वैमनस्यातून भावेशची हत्या केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून जिल्हापेठ पोलिसात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
खुनाची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, पोलिस निरीक्षक अरुण धनवडे, सहाय्यक निरीक्षक किशोर पवार व पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र सुरवाडे हे करीत आहेत.