वाळूवाहतुकदारांचे सोमवारी पुन्हा आंदोलन

0

जळगाव। यावर्षी स्थगित झालेल्या काही वाळू गटांच्या लिलावामुळे प्रशासनास झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी वैध वाळू वाहतुक परवानाधारकांकडून वाहनजप्ती करुन दंड वसुल करणार्‍या प्रशासनाच्या निषेधार्थ वाळू वाहतुकदारांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील रेती वाहतुक ठप्प झाली आहे. रेती वाहतूकदारांनी बंद पुकारल्याने बांधकामावर परिणाम झाल्याने कामगारांवर उपासमारीची वेळी आली आहे.

भेदभाव नेमका कोणामुळे
प्रशासनाकडून देखील उपोषणाची दखल घेण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोप वाळू वाहतुकदार संघटनेने केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाच्या चौथ्या दिवशी संजय ढेकळे, सुरज सोनवणे, निखिल पाटील, जगदिश सोनवणे, रहिमोद्दीन काझी हे उपोषणात सहभागी झाले होते. आंदोनलनासंदर्भात चर्चा करण्यासाठी 26 मे रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परवानाधारक वाहतुकदार संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रशासनाकडून वाळू वाहतूकदारांचा मागण्यासंदर्भात उपाययोजना केली जात नसल्याने न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला . दुसरीकडे काही अवैध वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांना केवळ दंड भरुन सोडले जात आहे. प्रशासनाकडून सुरू असलेला हा भेदभाव नेमका कोणाच्या दबावाखाली सुरू आहे असा सवाल वाळू वाहतुकदार संघटनेने केला आहे.