वाळू घाटावरून ट्रक-जेसीबी जप्त

0

अमरावती: धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा गावालगत असलेल्या वर्धा नदीवरील आष्टा वाळू घाटावर मोठ्या प्रमाणात वाळुचे उत्खनन सुरू होते. यावेळी उत्खननासाठी मोठ्या प्रमाणात नियमबाह्य साहित्य यंत्र सामग्रीचा वापर करण्यात येत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एलसीबीने गुरूवारी 15 जूनला सायंकाळी आष्टा घाटावर कारवाई करून जवळपास तीन कोटी रुपयांचे नियमबाह्य साहित्य जप्त केले आहे. वाळूघाटावर पेालिसांकडून झालेली ही अलीकडच्या काळातील सर्वात मोठी कारवाई आहे.

या प्रकरणात पोलिसांनी तुर्तास एकोणवीस ट्रकचालकाविरुध्द कारवाई केली असून आरोपींची संख्या वाढणार असल्याचे कारवाई करणार्‍या अधिकार्‍यांनी सांगितले आहे.