भुसावळ- पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार व पथकाने धडक कारवाई करीत वाळू चोरी करणार्यासह अवैध देशी दारू विके्रत्यावर तसेच बल्करवर कारवाई केल्याने खळबळ उडाली. शुक्रवारी पहाटे ाच वाजता जोगलखेडी शिवारात वाळू चोरी करताना वाहन पकडण्यात आले. या प्रकरणी तलाठी यांच्या फिर्यादीवरून वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दुसर्या कारवाईत गोजोरा गावाजवळ गुरुवारी रात्री 11.45 वाजता दुचाकीवरून देशी दारूची वाहतूक करणार्या सीताराम रामा सोनवणे यास पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून दोन हजार 446 रुपये किंमतीची दारू व दुचाकी जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली. बल्कर (एम.एच.20-ए.टी.9522) मधून राखेची वाहतूक होत असताना चालकाकडे कागदपत्राची मागणी केल्यानंतर कागदपत्रे न आढळल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई करून खटला न्यायालयात पाठवण्यात आला. दरम्यान, बल्कर हे ओव्हरलोड असण्याची शक्यता असून तपासणी करून कारवाईबाबत उपप्रादेशिक परीवहन कार्यालय, जळगाव यांना पत्र देण्यात आले. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक गजानन करेवाड, हवालदार प्रेम सपकाळे, सुनील चौधरी आदींच्या पथकाने केली.