वाळू चोरीबाबत ग्रामस्थांचे उपोषण सुटले; आता कारवाईकडे लक्ष

0

आमदार उन्मेष पाटील यांची भेट
प्रांताधिकारी यांची शिष्टाई

चाळीसगाव – गेल्या सात दिवसांपासून हिंगोणे सिम व हिंगोणे खुर्द ग्रामस्थांनी वाळू चोरी विरोधात सुरू केलेले आमरण उपोषणाला आज सायंकाळी पाच वाजता आमदार उन्मेष पाटील यांनी भेट दिली. यावेळी प्रांताधिकारी शरद पवार, मंडळ अधिकारी आर.एन.कुलकर्णी उपस्थित होते. यानंतर देखील आपली कैफियत सुरूच ठेवली ग्रामस्थांशी सुमारे एक तास संवाद साधत प्रांताधिकारी शरद पवार यांनी त्यांची भूमिका ऐकून घेतली. त्यावेळी वाळू चोरी बाबतच्या पंचनामानुसार सुमारे 6 कोटी रुपयांची वाळू चोरीची जबाबदारी संबधित आरोपीवर निश्चित करावी, ही आमची मागणी कायम असून तशी कारवाई करण्याचे लेखी पत्र आपण आम्हाला देत असाल तर आम्ही उपोषण मागे घेतो असा पवित्रा घेतल्याने अखेर प्रांताधिकारी शरद पवार यांनी तशी लेखी पत्रच ग्रामस्थांना दिले. त्यामुळे त्यांच्याच हातून लिंबू सरबत घेऊन हे उपोषण सोडण्यात आले आहे.

आता पुढील कारवाई होणार
यावेळी सरपंच ज्ञानेश्वर महाजन, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश पाटील, वीकासो चेअरमन सयाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. राज्यात गेले आठवडाभर चर्चिले गेलेले उपोषण अखेर मागे घेण्यात आल्याने या विषयावर होणाऱ्या चर्चा थांबणार असून पुढील कारवाई कडे लक्ष लागले आहे.