प्रांताधिकार्यांच्यावर अंगावर ट्रॅक्टर घातल्याचा आरोप निघाला खोटा
भुसावळ : रावेर तालुक्यातील निंभोरासीम नजीक तापी पात्रातून अवैधरीत्या होणारी वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या ऐजपूर फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजीत थोरबोले यांच्याशी असभ्य वर्तन करीत आत्महत्येची धमकी देणार्या भगवान हरी सवर्णे, किशोर अशोक कोळी (निंभोरासीम), संतोष सुकलाल राखुंडे (मानेगाव, ता.मुक्ताईनगर), गणेश नामदेव अवसरमल (हरताळा, ता.मुक्ताईनगर) यांच्याविरुद्ध निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना सोमवारी दुपारी घडली होती. आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक उपनिरीक्षक डी.एस.पाकळे यांनी दिली. वाळूची चोरी करून पळवून गेल्याप्रकरणी भादंवि 379 व अडथळा आणल्याप्रकरणी भादंवि 186 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.